आमदार असिफ सेठ यांची विरभद्र नगरला भेट। जाणून घेतल्या समस्या ….
बेळगाव:बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रविवारी फॉर्च्युन कॉलनी आणि वीरभद्र नगर परिसरात भेट देऊन पाहणी केली, आणि तेथील रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या. परिसरातील रहिवाशांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. पाणी साचणे, रस्त्यांचा विकास अशा विविध समस्यांवर आमदारांचे लक्ष वेधण्यात आले.
यावर आमदार आसिफ सेठ यांनी वीरभद्र नगर परिसरातील समस्यांचे निराकरण त्वरित करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले कि, विकासात्मक काम आणि इतर विविध प्रकल्पांवर चर्चा केली जात असून या भेटी चे मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष वास्तविक परिस्थिती जाणून घेणे हे होय. याप्रसंगी या प्रभागाचे नगरसेवक व अधिकारी आदी सहभागी झाले होते.


Home महत्वाची बातमी आमदार असिफ सेठ यांची विरभद्र नगरला भेट। जाणून घेतल्या समस्या ….
आमदार असिफ सेठ यांची विरभद्र नगरला भेट। जाणून घेतल्या समस्या ….
बेळगाव:बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रविवारी फॉर्च्युन कॉलनी आणि वीरभद्र नगर परिसरात भेट देऊन पाहणी केली, आणि तेथील रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या. परिसरातील रहिवाशांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. पाणी साचणे, रस्त्यांचा विकास अशा विविध समस्यांवर आमदारांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आमदार आसिफ सेठ यांनी वीरभद्र नगर परिसरातील समस्यांचे निराकरण त्वरित करण्यात […]