पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी हुकली

जिल्ह्यातील 45 कृषी सखींचा हिरमोड बेळगाव : जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतींमध्ये कृषी सखी म्हणून नेमणूक केलेल्या महिला प्रतिनिधींची पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निवड केली होती. मात्र वेळेअभावी सदर महिलांचा पंतप्रधानांशी संवाद झाला नाही. त्यामुळे कृषी सखींचा हिरमोड झाला. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये कृषीसखींची नेमणूक केली आहे. सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील 45 […]

पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी हुकली

जिल्ह्यातील 45 कृषी सखींचा हिरमोड
बेळगाव : जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतींमध्ये कृषी सखी म्हणून नेमणूक केलेल्या महिला प्रतिनिधींची पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निवड केली होती. मात्र वेळेअभावी सदर महिलांचा पंतप्रधानांशी संवाद झाला नाही. त्यामुळे कृषी सखींचा हिरमोड झाला. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये कृषीसखींची नेमणूक केली आहे. सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील 45 कृषी सखी महिलांची पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निवड केली होती. धारवाड येथील कृषी विद्यापीठाच्या आवारामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बेळगाव जि. पं. च्या एनआरएलएम, एनएमएमयु विभाग केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय व केंद्रीय पृषी व रयत कल्याण मंत्रालय यांच्या सहयोगाने उ. प्रदेश येथील वाराणसी येथे पंतप्रधान यांचा कार्यक्रम होता. नैसर्गिक कृषी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केले होते. बेळगाव जिल्ह्यातून 14 तालुक्यातील 45 महिलांची या कार्यक्रमासाठी निवड केली होती. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी खाते व शेतकरी यांच्यामध्ये दुवा म्हणून सदर कृषीसखी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र वेळेअभावी महिलांना पंतप्रधानांशी संवाद साधता आला नाही. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते सदर महिलांना प्रमाणपत्र वितरण करून गौरव करण्यात आला.