वीज क्षेत्राची मागणी पूर्ण करण्यास कोळसा मंत्रालय सज्ज

आगामी काळासाठी नियोजन : प्रल्हाद जोशी यांची माहिती नवी दिल्ली : कोळसा मंत्रालय 2024-25 या आर्थिक वर्षात वीज क्षेत्रातील 874 दशलक्ष टन कोळशाची मागणी पूर्ण करण्यास तयार आहे. ऊर्जा मंत्रालयाने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 821 दशलक्ष टनची मागणी केली होती. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी पीटीआयला ही माहिती दिली. जोशी म्हणाले […]

वीज क्षेत्राची मागणी पूर्ण करण्यास कोळसा मंत्रालय सज्ज

आगामी काळासाठी नियोजन : प्रल्हाद जोशी यांची माहिती
नवी दिल्ली :
कोळसा मंत्रालय 2024-25 या आर्थिक वर्षात वीज क्षेत्रातील 874 दशलक्ष टन कोळशाची मागणी पूर्ण करण्यास तयार आहे. ऊर्जा मंत्रालयाने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 821 दशलक्ष टनची मागणी केली होती. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी पीटीआयला ही माहिती दिली.
जोशी म्हणाले की, ऊर्जा मंत्रालयाची मागणी पूर्ण झाली आहे. त्यांनी 821 दशलक्ष टनची मागणी केली होती आणि ती पूर्ण करण्यात आली आहे. ते म्हणाले, ‘2024-25 या आर्थिक वर्षासाठी ऊर्जा मंत्रालयाने 874 दशलक्ष टन कोळशाची मागणी केली आहे. ही गरजही आम्ही पूर्ण करू. या वर्षी मार्चपर्यंत आपण एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा आकडा पार करणार आहोत.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात मिश्रित उद्देशांसाठी आयात केलेल्या कोळशाचा वाटा कमी झाला आहे. ते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिश्रणासाठी कोळशाची आयात सुमारे 22.22 दशलक्ष टन होती, तर याआधीच्या म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ती 308 दशलक्ष टन होती.
जोशी म्हणाले, कोळशाच्या आयातीतील कपातीमुळे अवघ्या एका वर्षात 82,264 कोटी रुपयांची बचत झाली आहे. 2026 पर्यंत कोळशाची आयात शून्यावर आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.