मंत्री दीपक केसरकरांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मंत्री दीपक केसरकरांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

सावंतवाडी । प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज सहकुटुंब येऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचाच विजय होईल असा दावा त्यांनी केला. श्री केसरकर यांनी आज सकाळी सावंतवाडी चितारआळी मतदान केंद्रावर सहकुटुंब जात मतदान केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी केसरकर, कन्या सोनाली, जावई व नातू उपस्थित होते.