मंत्री अशोक उईके यांच्यावर ‘भूमाफिया’ असल्याचा गंभीर आरोप
राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांचे वडील, प्रा. अशोक उईके यांच्या अडचणीत वाढ झाली असून एका स्थानिक वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या ऍड सीमा तेलंगे लोखण्डे यांनी त्यांच्यावर भूमाफिया असल्याचा आणि आदिवासी समाजाच्या जमीन हडप केल्याचा आरोप केला आहे.
ALSO READ: अजित पवारांच्या ‘21 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश?
एका मुलाखतीत तेलंगे यांनी उईके यांच्यावर हे आरोप केले. त्या म्हणाल्या, राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजाची पहिली सूतगिरणी स्थापन करण्याचा नावाखाली मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी समाजाची जमीन हडप केली.राळेगाव तालुक्यातील दवेधरी येथील भूरबा कोवे या शेतकऱ्याची 1951 पासून वहिती असलेली जमीन उईके यांनी बळकावून शेतकऱ्याच्या कुटुंबालाआज ही धमकी देत असल्याचे म्हटले. उईके आदिवासी विकास मंत्री असून देखील आदिवासी समुदायाला विकासापासून त्यांनी दूर ठेवले.
ALSO READ: महाराष्ट्र सरकारने सात नवीन पोलीस स्टेशन आणि अतिरिक्त वरिष्ठ पदांना मान्यता दिली
तसेच मंत्री अशोक उईके यांनी स्वतःच्या मुलीला मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळावी या साठी मुख्यमंत्र्यालयाकडून विशेषाधिकार वापरला, मुलीला सरकारी नौकरी मिळाल्यावर लगेचच आपल्या मुलीला यवतमाळ नगराध्यक्षपदाची भाजपची उमेदवार दिली.
मंत्री अशोक उईके यांच्या कार्यकाळात आदिवासींवर अन्याय झाला. असा आरोप तेलंगे यांनी केला आहे. तेलंगे यांनी जिल्ह्यातील आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणात मुलींनी तक्रार करूनही कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
ALSO READ: लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थींना मोठा झटका, आता घरपोच KYC होणार
सूतगिरणीची जमीन बळकावल्यासंदर्भात अॅड. तेलंगे यांनी केलेल्या आरोपांविषयी आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. अॅड. तेलंगे यांच्या आरोपांवर मी उत्तर द्यावे इतक्या त्या मोठ्या नाहीत.असा प्रति-आरोप करत मंत्री उईके यांनी या आरोपांमागे राजकारण असल्याचा दावा केला.
Edited By – Priya Dixit
