‘लोकमान्य’ कडोली शाखेचे कंग्राळी खुर्दमध्ये स्थलांतर

मध्यवर्ती ठिकाणामुळे ग्राहकांची सोय वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या कडोली शाखेचे स्थलांतर कंग्राळी खुर्द येथील मुख्य रस्त्यानजीक करण्यात आले आहे. जोतिबा कटांबळे यांच्या वास्तूमध्ये या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अजित गरगट्टी म्हणाले, ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक तसेच […]

‘लोकमान्य’ कडोली शाखेचे कंग्राळी खुर्दमध्ये स्थलांतर

मध्यवर्ती ठिकाणामुळे ग्राहकांची सोय
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या कडोली शाखेचे स्थलांतर कंग्राळी खुर्द येथील मुख्य रस्त्यानजीक करण्यात आले आहे. जोतिबा कटांबळे यांच्या वास्तूमध्ये या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अजित गरगट्टी म्हणाले, ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी सुरू केलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे जाळे देशभर पसरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदतीचा हात हाच उद्देश मनाशी बाळगून गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी बेळगावपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीप्रधान कडोली गावामध्ये शाखा सुरू केली. परंतु, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी शाखा असावी, या उद्देशाने कंग्राळी खुर्द येथील मुख्य रस्त्यानजीक शाखेचे स्थलांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे संचालक गजानन धामणेकर, सुबोध गावडे, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतला. कंग्राळी खुर्द शाखेचे व्यवस्थापक राजीव भातकांडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजीव भातकांडे यांनी सोसायटीच्या आकर्षक योजना, व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवीचा दर, महिलांसाठीच्या उन्नती योजना, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल इन्शुरन्स अशा विविध सेवा लोकमान्य सोसायटीतर्फे दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित ठेवीदारांनी संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी असिस्टंट रिजनल मॅनेजर (सेल्स) संतोष कृष्णाचे, सी. पी. कुलकर्णी यांच्यासह विविध शाखांचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.