म्हाडाच्या 2264 घरांची सोडत

म्हाडाच्या (mhada) कोकण मंडळाच्या 2264 (117 भूखंडांसह) घरांसाठी बुधवारी सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी 1 वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.या सोडतीत 24 हजार 911 पात्र अर्जदार सहभागी होणार असले, तरी त्यातील 90 टक्क्यांहून अधिक अर्थात 23 हजार 574 अर्जदार हे 20 टक्के योजनेतील 594 घरांच्या सोडतीत (lottery) सहभागी होणार आहेत. 20 टक्क्यांतील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा गृहनिर्माण आणि 15 टक्के योजनेतील घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे या योजनेतील 713 घरांसाठी अर्जच आलेले नाहीत. शून्य प्रतिसादामुळे ती घरे रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाकडून 2264 घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत होणार होती, तर सोडत 27 डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी सोडतीची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, अखेर 5 फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी ठाण्यात (thane) सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारची सोडत नेमकी किती घरांसाठी असेल याबाबत कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला. कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी एकूण 24 हजार 911 पात्र अर्ज सादर झाले आहेत. 15 टक्के योजनेतील 825 घरांसाठी केवळ 417 अर्ज दाखल झाले आहेत. तसेच 408 घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 728 घरांसाठी केवळ 434 अर्ज दाखल झाले आहेत. 305 घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, 2264 घरांच्या सोडतीतील 117 भूखंडांसाठी 147 अर्ज सादर झाले आहेत.हेही वाचा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर ड्रोनची नजर महापालिका अर्थसंकल्पात बेस्टला 1000 कोटी रुपये

म्हाडाच्या 2264 घरांची सोडत

म्हाडाच्या (mhada) कोकण मंडळाच्या 2264 (117 भूखंडांसह) घरांसाठी बुधवारी सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी 1 वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.या सोडतीत 24 हजार 911 पात्र अर्जदार सहभागी होणार असले, तरी त्यातील 90 टक्क्यांहून अधिक अर्थात 23 हजार 574 अर्जदार हे 20 टक्के योजनेतील 594 घरांच्या सोडतीत (lottery) सहभागी होणार आहेत. 20 टक्क्यांतील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा गृहनिर्माण आणि 15 टक्के योजनेतील घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे या योजनेतील 713 घरांसाठी अर्जच आलेले नाहीत. शून्य प्रतिसादामुळे ती घरे रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.कोकण मंडळाकडून 2264 घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत होणार होती, तर सोडत 27 डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी सोडतीची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, अखेर 5 फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी ठाण्यात (thane) सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारची सोडत नेमकी किती घरांसाठी असेल याबाबत कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला. कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी एकूण 24 हजार 911 पात्र अर्ज सादर झाले आहेत. 15 टक्के योजनेतील 825 घरांसाठी केवळ 417 अर्ज दाखल झाले आहेत. तसेच 408 घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 728 घरांसाठी केवळ 434 अर्ज दाखल झाले आहेत. 305 घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, 2264 घरांच्या सोडतीतील 117 भूखंडांसाठी 147 अर्ज सादर झाले आहेत.हेही वाचागैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर ड्रोनची नजरमहापालिका अर्थसंकल्पात बेस्टला 1000 कोटी रुपये

Go to Source