2025 मध्ये MHADA ची पुन्हा लॉटरी निघणार

म्हाडानं नुकतीच 2030 घरांसाठी आयोजित केलेली सोडत जाहीर करत त्यातील विजेत्यांची नावंही जारी केली. म्हाडाच्या या सोडत प्रक्रियेमध्ये अनेकांचंच हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं. म्हाडाच्या वतीनं देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार या सोडतीमध्ये 1,13,542 पैकी 2017 अर्जदारांना हक्काची घरं मिळाली. पण, ज्या अर्जदारांना यावेळी सोडतीमध्ये घरं मिळाली नाहीत, त्यांचा मात्र हिरमोड झाला.  अशा सर्वच इच्छुकांसाठी आता फक्त 7 महिन्यांची उत्सुकता पुरेशी ठरणार आहे. कारण, त्यानंतर म्हाडाची आणखी एक सोडत जारी केली जाणार आहे. 2025 मध्ये साधारण एप्रिल- मे महिन्यात म्हाडाच्या वतीनं आणखी एक सोडत जारी करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी यावेळची सोडत जाहीर करताना स्पष्ट केलं.  आगामी सोडतीसाठी किती घरं उपलब्ध करून दिली जातील किंवा ती घरं नेमकी कोणत्या भागांमध्ये असतील हे मात्र स्पष्ट करण्यात आलं नाही. त्यामुळे आता याच सोडतीची उत्सुकता आणि प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे.  म्हाडाच्या वतीनं आगामी सोडतीबाबत करण्यात आलेली घोषणा पाहता यंदाच्या सोडतीमध्ये घरांच्या बाबतीत अपयशी ठरलेल्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.  दरम्यान, नुकत्यात जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये म्हाडानं अत्यल्प, अल्प, उच्च आणि मध्यम गटातील घरं उपलब्ध करून देण्यात आली. साधारण 2030 घरांसाठीची ही सोडत ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांदरम्यान राबवण्यात आली होती.  म्हाडाच्या सोडतीमध्ये नाव आलेल्या विजेत्यांना निवासी दाखला असणाऱ्यांना विजेते ठरलेल्यांपैकी स्वीकृतीपत्र सादर करणाऱ्या विजेत्यांना देकारपत्र दिलं जाणार आहे. त्यानंतर सदनिकेची विक्री किंमत भरून घेणाऱ्यांना घराचा ताबा दिला जाणार आहे. निर्माणाधीन घरांच्या विजेत्यांकडून स्वीकृतीपत्र घेऊन इमारतींना निवासी दाखला मिळाल्यानंतर देकारपत्र देण्यात येईल. 

Go to Source