मेट्रो लाइन 9 ची चाचणी फेरी यशस्वी
दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे. मुंबई (mumbai) मेट्रो लाइन 9चा पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणार आहे. या मार्गिकेच्या चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच तर आता अंतिम सुरक्षा मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू आहेत. हे प्रक्रिया पूर्ण करून मंजुरी मिळताच ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे.मेट्रो लाइन 9 मुळे उत्तर मुंबईतील दहिसरला मिरा रोड (mira road) परिसरातील काशीगावशी थेट जोडणी मिळणार आहे. शिवाय ही मेट्रो दहिसर स्थानकातून दहिसर ते गुंडवली धावणाऱ्या मेट्रो लाइन 7ला ही थेट जोडणार आहे. ही मेट्रो सुरू होताच पश्चिम दृतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.दहिसर ते काशीगाव हा टप्पा 4.973 किमी लांब आहे. दहिसर पूर्व ते मिरा रोड जोडणाऱ्या या टप्प्याचं काम MMRDAकडून सुरू होतं. लोकल प्रवाशांनाही या मेट्रोचा उपयोग होणार आहे. या मार्गावर एकूण 8 स्थानकं आहेत. ही संपूर्ण मार्गिका 13.5 किमी लांब आहे. सध्या दहिसर (dahisar) ते मिरा भाईंदर प्रवासाला 1 तास लागतो. वाहतूक कोंडीच्या काळात तर 75 मिनिटांपर्यंत वेळ लागतो. या मेट्रो मार्गिकेनं प्रवासात केवळ 25-30 मिनिटं वेळ लागणार आहे.या मेट्रो मार्गिकेचं काम गेली 7 वर्ष सुरू आहे. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) मेट्रोची पाहणी केली असता काही किरकोळ तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. ही कामं येत्या काही दिवसांत पूर्ण करून मेट्रो सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. काम पूर्ण होताच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.दरम्यान, 2026मध्ये मुंबईत मेट्रो लाइन 2बी ही 23.6 किमी लांब मार्गिकाही सुरू होणार आहे. अंधेरीतील डीएन नगर ते मानखुर्द जवळील मंडाले अशी ही मार्गिका असणार आहे. या मार्गिकेवर एकूण 20 स्थानकं असणार आहेत. त्याचबरोबर, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकूल, चेम्बूर आणि मान्खुर्द स्थानकांवर इंटरचेंजही बनवण्यात येणार आहेत.हेही वाचापालिकेच्या सभेत शाळा दत्तक धोरणावरून गोंधळपनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम वेगात
Home महत्वाची बातमी मेट्रो लाइन 9 ची चाचणी फेरी यशस्वी
मेट्रो लाइन 9 ची चाचणी फेरी यशस्वी
दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.
मुंबई (mumbai) मेट्रो लाइन 9चा पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणार आहे. या मार्गिकेच्या चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
तसेच तर आता अंतिम सुरक्षा मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू आहेत. हे प्रक्रिया पूर्ण करून मंजुरी मिळताच ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे.
मेट्रो लाइन 9 मुळे उत्तर मुंबईतील दहिसरला मिरा रोड (mira road) परिसरातील काशीगावशी थेट जोडणी मिळणार आहे.
शिवाय ही मेट्रो दहिसर स्थानकातून दहिसर ते गुंडवली धावणाऱ्या मेट्रो लाइन 7ला ही थेट जोडणार आहे. ही मेट्रो सुरू होताच पश्चिम दृतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
दहिसर ते काशीगाव हा टप्पा 4.973 किमी लांब आहे. दहिसर पूर्व ते मिरा रोड जोडणाऱ्या या टप्प्याचं काम MMRDAकडून सुरू होतं.
लोकल प्रवाशांनाही या मेट्रोचा उपयोग होणार आहे. या मार्गावर एकूण 8 स्थानकं आहेत. ही संपूर्ण मार्गिका 13.5 किमी लांब आहे.
सध्या दहिसर (dahisar) ते मिरा भाईंदर प्रवासाला 1 तास लागतो. वाहतूक कोंडीच्या काळात तर 75 मिनिटांपर्यंत वेळ लागतो. या मेट्रो मार्गिकेनं प्रवासात केवळ 25-30 मिनिटं वेळ लागणार आहे.
या मेट्रो मार्गिकेचं काम गेली 7 वर्ष सुरू आहे. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) मेट्रोची पाहणी केली असता काही किरकोळ तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामं येत्या काही दिवसांत पूर्ण करून मेट्रो सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. काम पूर्ण होताच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, 2026मध्ये मुंबईत मेट्रो लाइन 2बी ही 23.6 किमी लांब मार्गिकाही सुरू होणार आहे. अंधेरीतील डीएन नगर ते मानखुर्द जवळील मंडाले अशी ही मार्गिका असणार आहे.
या मार्गिकेवर एकूण 20 स्थानकं असणार आहेत. त्याचबरोबर, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकूल, चेम्बूर आणि मान्खुर्द स्थानकांवर इंटरचेंजही बनवण्यात येणार आहेत.हेही वाचा
पालिकेच्या सभेत शाळा दत्तक धोरणावरून गोंधळ
पनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम वेगात
