बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रत्यवर्ती चक्रीवादळामुळे राज्यात काही भागांत 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यात येत्या तीन दिवसांत तापमान वाढणार आहे. उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर, अमरावती, यवतमाळसह काही जिल्ह्यांत तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचू न शकल्याने रात्रीच्या थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील उच्चतम तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतेपासून बचाव करण्याचा, तसेच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीपूर्वीच दिल्लीतील वातावरण प्रसन्न झाले आहे. काल रात्री उशिरापासून दिल्ली, नोएडा आणि एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान, तामिळनाडूच्या काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात 1-3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्याच वेळी, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये अनेक ठिकाणी 1-3 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. पावसासोबतच पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने 23 फेब्रुवारीपर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात प्रत्यवर्ती चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे गंगेच्या मैदानी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 20, 22 आणि 23 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशामध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.हेही वाचापालघर : 777 झाडांच्या कत्तलीस उच्च न्यायालयाची स्थगिती
ठाणे महानगरपालिकेची पीओपी मूर्तींवर बंदी
Home महत्वाची बातमी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रत्यवर्ती चक्रीवादळामुळे राज्यात काही भागांत 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यात येत्या तीन दिवसांत तापमान वाढणार आहे. उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर, अमरावती, यवतमाळसह काही जिल्ह्यांत तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचू न शकल्याने रात्रीच्या थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील उच्चतम तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतेपासून बचाव करण्याचा, तसेच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे.
23 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीपूर्वीच दिल्लीतील वातावरण प्रसन्न झाले आहे. काल रात्री उशिरापासून दिल्ली, नोएडा आणि एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान, तामिळनाडूच्या काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात 1-3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
त्याच वेळी, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये अनेक ठिकाणी 1-3 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. पावसासोबतच पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने 23 फेब्रुवारीपर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात प्रत्यवर्ती चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे गंगेच्या मैदानी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बिहार आणि झारखंडमध्ये 20, 22 आणि 23 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशामध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.हेही वाचा
पालघर : 777 झाडांच्या कत्तलीस उच्च न्यायालयाची स्थगितीठाणे महानगरपालिकेची पीओपी मूर्तींवर बंदी