शक्तिप्रदर्शनाने म.ए.समिती आज दाखल करणार अर्ज
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने शुक्रवार दि. 19 रोजी दाखल करण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौकातून सकाळी 10 वाजता मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी बैठक घेऊन हे ठरविण्यात आले आहे. यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील होते. मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यात येणार असून शहरातील तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीला रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, नगरसेवक रवी साळुंखे, माजी उपमहापौर संजय शिंदे, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते सागर पाटील, मदन बामणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी शक्तिप्रदर्शनाने म.ए.समिती आज दाखल करणार अर्ज
शक्तिप्रदर्शनाने म.ए.समिती आज दाखल करणार अर्ज
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने शुक्रवार दि. 19 रोजी दाखल करण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौकातून सकाळी 10 वाजता मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी बैठक घेऊन हे ठरविण्यात आले आहे. यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील होते. मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यात येणार […]
