बॉम्ब निर्मितीवेळी मारले गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्मारक
केरळमध्ये माकपकडून स्मारकाची निर्मिती : भडकला वाद
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या कन्नूरमध्ये जून 2015 मध्ये बॉम्ब तयार करताना जीव गमाविलेल्या माकपच्या दोन कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक तयार करण्यात आले आहे. पक्षाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन हे बुधवारी या स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. तर स्मारक निर्मितीवरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणावरून माकपला लक्ष्य केले आहे. तर माकपचे वरिष्ठ नेते यासंबंधी मौन बाळगून आहेत. तर पक्षाचे नेते. पी. जयराजन यांनी स्मारक निर्माण करण्याच्या निर्णयाला योग्य ठरविले आहे.
पक्ष कार्यकर्त्यांना ‘बॉम्ब राजकारणी’ ठरविल्याप्रकरणी जयराजन यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. उजव्या विचारसरणीच्या दिशेने झुकलेल्या प्रसारमाध्यमांनी 2015 मध्ये स्वत:च्या जीवनाचे बलिदान देणाऱ्यांना बॉम्ब राजकारणी ठरविले असल्याचे म्हणत जयराजन यांनी स्फोटात मारले गेलेले पक्ष कार्यकर्ते शैजू आणि सुबीश यांची छायाचित्रे शेअर केली आहेत.
पोयिलूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वत:च्या स्वयंसेवकांच्या सन्मानार्थ ‘अश्विनी-सुरेंद्रन मंदिर’ नावाचे स्मारक निर्माण केले आहे. संबंधित व्यक्ती 2002 मध्ये बॉम्ब तयार करताना मारले गेले होते. याचबरोबर संघाने चेरुवनचेरीमध्ये बॉम्ब तयार करताना जीव गमाविलेल्या प्रदीपन आणि दिलीप यांच्यासाठी स्मारकाची निर्मिती केल्याचा दावा जयराजन यांनी केला आहे.
काँग्रेसकडून बॉम्बच्या राजकारणाची सुरुवात
कन्नूरमध्ये ‘बॉम्बचे राजकारण’ सुरू करण्याचे श्रेय काँग्रेस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांनाच जाते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कन्नूरमध्ये पहिल्यांदा डीसीसी कार्यालयावर बॉम्ब फेकले होते असा दावा जयराजन यांनी केला आहे. पनूरच्या मुलियाथोडेमध्ये बॉम्बस्फोटात मारले गेलेल्या लोकांचे नाव माकपच्या शहीदांच्या यादीत सामील होणार नाही. हे मृत्यू दोन समुहांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम असल्याने त्यांना बलिदान मानले जाणार नाही. प्रसारमाध्यमे आणि विरोधी पक्ष या मृत्यू प्रकरणाचा वापर माकपविरोधात करत आहेत. पक्षाने जाहीरपणे या घटनेची निंदा केली असल्याचा दावा जयराजन यांनी केला आहे.
काँग्रेसकडून माकपवर निशाणा
केरळमध्ये माकप एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी समुहाच्या स्वरुपात काम करत आहे. कुणाला मारायचे हे ते निश्चित करतात आणि मग ठिकाण ठरवून शस्त्रांची व्यवस्था देखील करतील. गुन्हेगार किंवा पक्ष कार्यकर्त्यांना कामावर ठेवतील आणि ते गुन्हे करतील. मग गुन्हेगारांना माकपकडून अभय दिले जाते. कुणाला तरी तुरुंगात पाठवून त्याच्या परिवाराचे रक्षण केले जाते. ही एका दहशतवादी गटाची शैली आहे. माकप स्वत:च्या कार्यकर्त्यांना बॉम्बनिर्मितीसाठी प्रोत्साहित करत असून निर्देश देत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
जून 2015 मध्ये बॉम्ब तयार करताना जीव गमावलेल्या माकपच्या दोन कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक निर्माण करण्यात आले आहे. स्मारकाच्या उद्घाटनाची घोषणा करणारे पोस्टर समोर आल्यावर काँग्रेस आणि भाजपने माकपवर जोरदार निशाणा साधला आहे. बॉम्ब तयार करणे ही माकपच्या राजकीय कार्यक्रमाचा हिस्सा असल्याचे यातून सिद्ध होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी बॉम्ब निर्मितीवेळी मारले गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्मारक
बॉम्ब निर्मितीवेळी मारले गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्मारक
केरळमध्ये माकपकडून स्मारकाची निर्मिती : भडकला वाद वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम केरळच्या कन्नूरमध्ये जून 2015 मध्ये बॉम्ब तयार करताना जीव गमाविलेल्या माकपच्या दोन कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक तयार करण्यात आले आहे. पक्षाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन हे बुधवारी या स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. तर स्मारक निर्मितीवरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणावरून माकपला लक्ष्य केले […]