खानापूर-लिंगनमठ रस्त्याच्या विकासासाठी खासदार विश्वेश्वर हेगडे यांना निवेदन

खानापूर : बेळगाव-तालगुप्पा राज्य महामार्गावरील खानापूर ते अळणावर या रस्त्याची संपूर्णपणे दुरवस्था झाली असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यासाठी या रस्त्याचा तातडीने विकास करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन लिंगनमठ, कक्केरी भागातील नागरिकांच्यावतीने पत्रकार जोतिबा भेंडिगेरी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खानापूरच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना दिले. बेळगाव-तालगुप्पा महामार्गावरील खानापूर ते अळणावरपर्यंतचा […]

खानापूर-लिंगनमठ रस्त्याच्या विकासासाठी खासदार विश्वेश्वर हेगडे यांना निवेदन

खानापूर : बेळगाव-तालगुप्पा राज्य महामार्गावरील खानापूर ते अळणावर या रस्त्याची संपूर्णपणे दुरवस्था झाली असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यासाठी या रस्त्याचा तातडीने विकास करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन लिंगनमठ, कक्केरी भागातील नागरिकांच्यावतीने पत्रकार जोतिबा भेंडिगेरी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खानापूरच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना दिले. बेळगाव-तालगुप्पा महामार्गावरील खानापूर ते अळणावरपर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी उद्ध्वस्त झाला आहे.
तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. हा रस्ता मुख्य असून या रस्त्यावरुन यल्लापूर, शिर्शी, कारवारसह अनेक ठिकाणी संपर्कासाठी मुख्य रस्ता आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठी नवनिर्वाचित खासदारांनी या रस्त्यासंदर्भात जातीने लक्ष घालून या रस्त्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कक्केरी, लिंगनमठ परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.