थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी-केएलईमध्ये सामंजस्य करार

फिलाल्डेफिया येथे झाली बैठक : विविध विषयांवर करार बेळगाव : फिलाल्डेफिया येथील थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी व केएलई अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (काहेर), जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये नुकतीच संयुक्त बैठक पार पडली. फिलाल्डेफिया येथील झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आला. 2017 पासून थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी व केएलई जेएनएमसीमध्ये इंडिया सेंटर फॉर स्टडीज यासाठी समन्वय करार करण्यात […]

थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी-केएलईमध्ये सामंजस्य करार

फिलाल्डेफिया येथे झाली बैठक : विविध विषयांवर करार
बेळगाव : फिलाल्डेफिया येथील थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी व केएलई अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (काहेर), जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये नुकतीच संयुक्त बैठक पार पडली. फिलाल्डेफिया येथील झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आला. 2017 पासून थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी व केएलई जेएनएमसीमध्ये इंडिया सेंटर फॉर स्टडीज यासाठी समन्वय करार करण्यात आला होता. तेव्हापासून केएलईमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण तसेच संशोधन करण्यासाठी थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीची मदत होत आहे.
युनिव्हर्सिटीच्या इटली, आयर्लंड, इस्रायल या देशांमध्येही शाखा
या युनिव्हर्सिटीच्या इटली, आयर्लंड व इस्रायल या देशांमध्येही शाखा आहेत. पब्लिक हेल्थ, युरोलॉजी, इंट्रेगेटिव्ह मेडिसन या संदर्भात माहितीचे अदान-प्रदान केले जाते. दोन्ही संस्थांमधील विद्यार्थी एकमेकांच्या संस्थांमध्ये संशोधन करीत आहेत. जेएनएमसीचे काही विद्यार्थी सध्या कार्डिओलॉजी, पिडीअॅट्रीक, सायकॅस्ट्रीक, रेडिओलॉजी, युरोलॉजी यामध्ये कार्यरत आहेत. या कार्यक्रमाला थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष सुसन अलड्रीगे, विभागप्रमुख डॉ. सईद इब्राहिम, जागतिक विभाग प्रमुख रिचर्ड डेर्मन, केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.