रोटरी वेणुग्रामतर्फे शनिवारी मेगा जॉब फेअरचे आयोजन

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्यावतीने व बेंगळूर येथील स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटच्या सहकार्याने शनिवार दि. 22 रोजी ‘रोटरी मेगा जॉब फेअर-2024’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत क्लब रोड येथील भाऊराव काकतकर कॉलेजच्या सभागृहात हा भरती मेळावा होणार आहे. 50 हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी होतील, अशी माहिती […]

रोटरी वेणुग्रामतर्फे शनिवारी मेगा जॉब फेअरचे आयोजन

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्यावतीने व बेंगळूर येथील स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटच्या सहकार्याने शनिवार दि. 22 रोजी ‘रोटरी मेगा जॉब फेअर-2024’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत क्लब रोड येथील भाऊराव काकतकर कॉलेजच्या सभागृहात हा भरती मेळावा होणार आहे. 50 हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी होतील, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव तसेच जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम विविध उपक्रम राबवित आहे. मागील वर्षीही आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअरमधून 600 मुलांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या होत्या. तर 8 ते 10 महिलांना अॅपल कंपनीमध्ये चांगली संधी मिळाली. यावर्षीही असाच उपक्रम राबविण्यात आला असून बेळगावच्या स्थानिक कंपन्यांसोबत बेंगळूर, पुणे, मुंबई, अहमदाबाद, म्हैसूर येथील नामांकित कंपन्या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.
मॅन्युफ्रॅक्चरिंग, टेक्स्टाईल, रिटेल, सेल्स, हेल्थकेअर यासह इतर कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावीपासून मास्टर डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये पाहून नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. हा रोजगार मेळावा पूर्णपणे मोफत असून अधिक माहितीसाठी 8105308804 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन डी. बी. पाटील यांनी केले. यावेळी मल्लिकार्जुन मुरगुंडे, शिवानंद पाटील यासह इतर उपस्थित होते.