विमानतळ-धावपट्टी सुरक्षेबाबत बैठक

पक्षी, प्राण्यांचा धोका वेळीच रोखण्याचा निर्णय : सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याची सूचना बेळगाव : बेळगाव विमानतळावरील सुरक्षेबाबत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीमध्ये बीसीएसीचे विभागीय संचालक व इतर सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुरक्षेच्या उपायांबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी सुरक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी मांडल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असावी, […]

विमानतळ-धावपट्टी सुरक्षेबाबत बैठक

पक्षी, प्राण्यांचा धोका वेळीच रोखण्याचा निर्णय : सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याची सूचना
बेळगाव : बेळगाव विमानतळावरील सुरक्षेबाबत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीमध्ये बीसीएसीचे विभागीय संचालक व इतर सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुरक्षेच्या उपायांबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी सुरक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी मांडल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस दलाचे अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. विमानाचे उड्डाण होत असताना किंवा विमान उतरत असताना पक्षी, तसेच कोल्हे-कुत्री यांचा धोका असतो. ते मुख्य धावपट्टीपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी यंत्रणा राबविण्याबाबत काही दिवसांपूर्वीच कार्यशाळाही घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.