कोरोना दक्षतेबाबत मनपामध्ये बैठक
महापौरांच्या कक्षामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा
बेळगाव : कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. बेळगाव जिल्ह्यातही एक रुग्ण आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमणाचे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून कोरोनापासून घ्यावयाच्या दक्षतेबाबत चर्चा केली. महानगरपालिकेच्या माध्यमातून पुन्हा याबाबत जनजागृती करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले, कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मास्क वापरा, विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. याचबरोबर हात स्वच्छ ठेवणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. हा आजार पुन्हा बळावू नये, याची खबरदारी प्रत्येकानेच घेणे महत्त्वाचे आहे.
महापौर शोभा सोमणाचे यांनी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. सर्वत्र फलक लावावेत, त्या माध्यमातून जनतेला जागृत करावे, असे त्यांनी सांगितले. मास्क वापरल्यास हा आजार पसरणे थांबू शकते. त्यामुळे यापुढे मास्क वापरण्यासाठी जनतेने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. कचऱ्याची वेळेत उचल करावी, याचबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवणेही महत्त्वाचे आहे. सुरक्षित अंतर ठेवावे, कोणालाही सर्दी, खोकला, ताप आल्यास तातडीने चाचणी करावी. जेणेकरून हा संसर्गजन्य आजार पसरणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे डॉ. महेश कोणी यांनी सांगितले. या बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरे, आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे, नगरसेवक हणमंत कोंगाली, श्रीशैल कांबळे, जिरग्याळ, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह इतर नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी कोरोना दक्षतेबाबत मनपामध्ये बैठक
कोरोना दक्षतेबाबत मनपामध्ये बैठक
महापौरांच्या कक्षामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा बेळगाव : कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. बेळगाव जिल्ह्यातही एक रुग्ण आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमणाचे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून कोरोनापासून घ्यावयाच्या दक्षतेबाबत चर्चा केली. महानगरपालिकेच्या माध्यमातून पुन्हा याबाबत जनजागृती करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले, कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. […]