कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरणासाठी गुरुवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या महानगरपालिकेतील हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळाली आहे. दिल्ली येथे बैठक झाल्यानंतर आता गुरुवार दि. 14 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाणार आहे. बेळगावसह देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हस्तांतरण केले जाणार असल्याने सर्व माहिती जमा केली जात आहे. संरक्षण मंत्रालयाने हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी माहिती मागवली होती. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे बैठक बोलाविली. या बैठकीला ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व सीईओ राजीव कुमार उपस्थित होते. बैठकीदरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डचा महसूल, खुल्या जागा, कर्मचारी, त्यांचे वेतन यासह इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर आता गुरुवारी पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. हस्तांतरण प्रक्रियेत अडचणी ठरलेल्या बाबींविषयी यादरम्यान चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला बोर्डचे अध्यक्ष, तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Home महत्वाची बातमी कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरणासाठी गुरुवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन
कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरणासाठी गुरुवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या महानगरपालिकेतील हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळाली आहे. दिल्ली येथे बैठक झाल्यानंतर आता गुरुवार दि. 14 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाणार आहे. बेळगावसह देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हस्तांतरण केले जाणार असल्याने सर्व माहिती जमा केली जात आहे. संरक्षण मंत्रालयाने हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी माहिती मागवली होती. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी […]
