Kolhapur News : लिंगनूर दुमाला येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बजावला मतदानाचा हक्क

                             हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला केले मतदान  सेनापती कापशी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथे आठ वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला. […]

Kolhapur News : लिंगनूर दुमाला येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बजावला मतदानाचा हक्क

                             हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला केले मतदान 
सेनापती कापशी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथे आठ वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मतदान केंद्रावर शांततापूर्ण वातावरण होते. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नऊ वर्षानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्र परिसरात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती.