आंबा उत्पादन वाढीसाठी उपाययोजना
बागायत खात्यातर्फे निश्चित उत्पादनासाठी सल्ला
बेळगाव : आंबा हंगामाला प्रारंभ होवू लागला आहे. आंबा बागेत मोहोर बहरू लागला आहे. त्यामुळे बागायतदारांनी आंबा मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अपेक्षित उत्पन्नासाठी कीड आणि रोगावर वेळीच नियंत्रण आणावे, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे. यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांवर किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अलिकडे आंबा उत्पादन वाढविण्यासाठी केशर जातीच्या आंब्यांची लागवड झाली आहे. मात्र आंबा मोहोर आणि फुलांच्या व्यवस्थापनासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. काही बागांमध्ये पानावर ठिपके आणि रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत बागायतदारांनी योग्य औषधाची मात्रा देऊन रोग नियंत्रणात आणावा. जिल्ह्dयात 2 हजार 860 हेक्टर आंब्यांचे उत्पादन होते. सर्वाधिक खानापूर तालुक्यात आंब्याचे क्षेत्र आहे. अलिकडे बागायती क्षेत्र वाढू लागले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध फळे उपलब्ध होवू लागली आहेत. त्याबरोबर आंबा उत्पादनही वाढू लागले आहे.
शेतकऱ्यांनी मँगो स्पेशल औषधाची फवारणी करावी
आंबा लागवड एप्रिल आणि मे दरम्यान अधिक असते. सध्या आंबा बागायतीला मोहोर बहरु लागला आहे. अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी वेळेत कीड नियंत्रण आणि इतर मात्रा देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी मँगो स्पेशल औषधाची फवारणी करावी, असे आवाहनही बागायतीने केले आहे.
होलसेल फ्रूट मार्केटमध्ये कोकणातील आंबा दाखल
होलसेल फ्रूट मार्केटमध्ये कोकणातील आंबा दाखल होवू लागला आहे. स्थानिक आंबा उशीराने दाखल होतो. त्यानंतर काही प्रमाणात आंब्याचे दर खाली येतात. बेळगाव जिल्ह्यात आंबा उत्पादन वाढविण्यासाठी बागायतदारांनी कंबर कसली आहे. विविध ठिकाणी सवलतीच्या दरात रोप वाटप आणि इतर कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून अपेक्षित उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
Home महत्वाची बातमी आंबा उत्पादन वाढीसाठी उपाययोजना
आंबा उत्पादन वाढीसाठी उपाययोजना
बागायत खात्यातर्फे निश्चित उत्पादनासाठी सल्ला बेळगाव : आंबा हंगामाला प्रारंभ होवू लागला आहे. आंबा बागेत मोहोर बहरू लागला आहे. त्यामुळे बागायतदारांनी आंबा मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अपेक्षित उत्पन्नासाठी कीड आणि रोगावर वेळीच नियंत्रण आणावे, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे. यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांवर किडीचा प्रादुर्भाव […]