मॅक्लारेनचा ऑस्कर पियास्ट्रीचे पहिले फॉर्मुला वन जेतेपद
वृत्तसंस्था/ मोगयोरॉड, हंगेरी
ऑस्ट्रेलियाचा रेस ड्रायव्हर ऑस्कर पियास्ट्रीने पहिले फॉर्मुला वन जेतेपद मिळविले असून येथे झालेल्या हंगेरियन ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद पटकावले. मॅक्लारेनचा त्याचा संघसहकारी लँडो नॉरिसने दुसरे स्थान मिळविले. मॅक्लारेनच्या या जोडीने पहिल्या व दुसऱ्या स्थानावरून शर्यतीला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत त्यांनी ती कायम राखत यश मिळविले. पहिल्या लॅपपासूनच पियास्ट्रीने आघाडी राखली होती. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनला तिसरे स्थान मिळाले.
याशिवाय फेरारीचा चार्लस लेक्लर्कने चौथे, रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने पाचवे स्थान मिळविले. फेरारीच्या कार्लोस सेन्झने सहावे, रेड बुलच्या सर्जिओ पेरेझने सातवे, जॉर्ज रसेलने आठवे, आरबी फॉर्मुला वन टीमच्या युकी सुनोदाने नववे व अॅस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने दहावे स्थान मिळविले. अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोचा गुण मात्र थोडक्यात हुकला. त्याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आरबी टीमच्या डॅनियल रिकार्दोसाठी मात्र ही स्पर्धा निराशाजनक ठरली. त्याने नवव्या स्थानावरून सुरुवात केली होती. पण पहिल्या दहांत त्याला स्थान मिळविता आले नाही.
Home महत्वाची बातमी मॅक्लारेनचा ऑस्कर पियास्ट्रीचे पहिले फॉर्मुला वन जेतेपद
मॅक्लारेनचा ऑस्कर पियास्ट्रीचे पहिले फॉर्मुला वन जेतेपद
वृत्तसंस्था/ मोगयोरॉड, हंगेरी ऑस्ट्रेलियाचा रेस ड्रायव्हर ऑस्कर पियास्ट्रीने पहिले फॉर्मुला वन जेतेपद मिळविले असून येथे झालेल्या हंगेरियन ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद पटकावले. मॅक्लारेनचा त्याचा संघसहकारी लँडो नॉरिसने दुसरे स्थान मिळविले. मॅक्लारेनच्या या जोडीने पहिल्या व दुसऱ्या स्थानावरून शर्यतीला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत त्यांनी ती कायम राखत यश मिळविले. पहिल्या लॅपपासूनच पियास्ट्रीने आघाडी राखली होती. मर्सिडीजच्या […]