एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने नदीत उडी घेत आत्महत्या केली

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक बातमी समोर येत आहे, येथे एका मुलीने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पहिल्यांदाच उडी मारताना ती वाचली नंतर तिने पुन्हा जीव देण्यासाठी …

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने नदीत उडी घेत आत्महत्या केली

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक बातमी समोर येत आहे, येथे एका मुलीने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पहिल्यांदाच उडी मारताना ती वाचली नंतर तिने पुन्हा जीव देण्यासाठी पाण्यात उडी घेतली आणि आपले आयुष्य संपविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. मुलीने आत्महत्या का केली अद्याप समजू शकले नाही. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय ईशा बिंजवे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी आहे. ईशाचे आई-वडील दोघेही होमिओपॅथी डॉक्टर असून ब्रम्हपुरी शहरात त्यांचे क्लिनिक आहे. चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ईशाने उडी मारून आत्महत्या केली. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मुलीने पहिल्यांदा पाण्यात उडी घेतल्यावर ती कमी पाणी असल्यामुळे वाचली. पुन्हा तिने जीव देण्याचा निर्णय घेत. खोल पाण्यात उडी घेतली. आणि आत्महत्या केली. 

तरुणीने आपली स्कूटर आणि चप्प्प्ल पुलावर सोडली आणि पाण्यात उडी घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम राबवून दुसऱ्या दिवशी पिंपळगाव जवळील नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढला.पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरु केला.

 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source