महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली गतिमान
कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव
बेळगाव : महापौर-उपमहापौरांचा कालावधी दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे आता नवीन महापौर निवडीचे वेध साऱ्यांनाच लागले आहेत. महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्तांना याबाबत प्रस्ताव पाठवून देण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याबद्दल प्रादेशिक आयुक्तांकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे कौन्सिल सेक्रेटरी अंजना बजंत्री यांनी सांगितले. बेळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. यावेळी महापौरपदासाठी अनुसूचित महिला आरक्षण आहे. तर उपमहापौर हे सर्वसामान्यांसाठी असणार आहे. त्यामुळे आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापालिकेमध्ये एकूण 58 नगरसेवक आहेत. तर 2 खासदार, 4 आमदार आणि 1 विधान परिषद सदस्य असून हे ही मतदार आहेत. त्यामुळे एकूण 65 मतदार आहेत. भाजप 39, काँग्रेस 13, एमआयएम 1, म. ए. समिती व अपक्ष 12 असे संख्याबळ आहे. आता 5 फेब्रुवारीला विद्यमान महापौर शोभा सोमणाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. अनुसूचित महिला आरक्षण आल्यामुळे सर्वसामान्य नगरसेवकांमध्ये इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. सध्या कौन्सिल विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रादेशिक आयुक्तांकडून सूचना आल्यानंतरच निवडणुकीच्या तयारीला कौन्सिल विभाग लागणार आहे.
Home महत्वाची बातमी महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली गतिमान
महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली गतिमान
कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव बेळगाव : महापौर-उपमहापौरांचा कालावधी दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे आता नवीन महापौर निवडीचे वेध साऱ्यांनाच लागले आहेत. महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्तांना याबाबत प्रस्ताव पाठवून देण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याबद्दल प्रादेशिक आयुक्तांकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे कौन्सिल सेक्रेटरी अंजना बजंत्री यांनी सांगितले. बेळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता […]