PBKS विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीचा प्लेइंग XI असा असू शकतो, नायरला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो
दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या ११ सामन्यांत ६ विजय आणि १३ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्यांचा SRH विरुद्धचा मागील सामना पावसामुळे रद्द झाला होता.
ALSO READ: CSK संघाला अखेर विजय मिळाला, हा धडाकेबाज फलंदाज बनला सर्वात मोठा हिरो!
आयपीएल २०२५ चा ५८ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ सध्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. पंजाब किंग्जचा संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. जर दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यांना कोणत्याही किंमतीत हा सामना जिंकावा लागेल.
या सामन्यासाठी दिल्लीच्या प्लेइंग XI मध्ये काही बदल दिसून येऊ शकतात. करुण नायरला संघातून वगळले जाऊ शकते. तो गेल्या काही सामन्यांपासून प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे पण त्याच्या बॅटने तिथे चांगली कामगिरी केलेली नाही. या हंगामातील त्याच्या पहिल्या सामन्यात त्याने ८९ धावांची खेळी केली होती, पण त्याशिवाय उर्वरित सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्याच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहणे रंजक ठरेल.
Edited By- Dhanashri Naik