जयपूरच्या एसएमएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग, ८ रुग्णांचा मृत्यू

जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने सात रुग्णांचा मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रशासनाने चौकशीसाठी एक पथक तयार केले आहे.

जयपूरच्या एसएमएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग, ८ रुग्णांचा मृत्यू

जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने ८ रुग्णांचा मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रशासनाने चौकशीसाठी एक पथक तयार केले आहे.

ALSO READ: मध्य रेल्वे कडून ट्रॅक अपग्रेडेशनसाठी रात्रीचा ब्लॉक जाहीर
मिळालेल्या माहितीनुसार जयपूरमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या सवाई मान सिंह हॉस्पिटल (एसएमएस) मध्ये रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली, त्यावेळी ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू वॉर्ड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीचे कारण सुरुवातीला शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.  

अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयाच्या संकुलात घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या सुमारे एक डझन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.  

ALSO READ: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बालकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र सरकारची कडक कारवाई; कफ सिरपवर बंदी
घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांना सर्व शक्य ती मदत आणि त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.  

ALSO READ: लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, दोन महिन्यांच्या मुदतीमुळे महिलांचा ताण वाढला
Edited By- Dhanashri Naik

Go to Source