अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया एरोस्पेस प्लांटमध्ये भीषण आग, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

अमेरिकेतील एका एरोस्पेस उत्पादकाच्या कारखान्यात भीषण आग लागली. मंगळवारी स्थानिक शाळा बंद ठेवाव्या लागल्या यावरून आगीची तीव्रता किती होती याचा अंदाज येतो. स्थानिक रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. वृत्तसंस्था एपी ने …

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया एरोस्पेस प्लांटमध्ये भीषण आग, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

अमेरिकेतील एका एरोस्पेस उत्पादकाच्या कारखान्यात भीषण आग लागली. मंगळवारी स्थानिक शाळा बंद ठेवाव्या लागल्या यावरून आगीची तीव्रता किती होती याचा अंदाज येतो. स्थानिक रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. वृत्तसंस्था एपी ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग फिलाडेल्फियाच्या उत्तरेला लागली. 

ALSO READ: अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर्सची भरती होणार नाही,अमेरिकन सैन्याने बंदी घातली

सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 9:30 वाजता जेनकिनटाउन येथील एरोस्पेस उत्पादक एसपीएस टेक्नॉलॉजीजच्या प्लांटमध्ये भीषण आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर गोदामात आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.

ALSO READ: मालीमध्ये सोन्याची खाण कोसळल्याने 42 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
अबिंग्टन टाउनशिप पोलिस विभागाने सांगितले की इमारत ताबडतोब रिकामी करण्यात आली. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झाले नाही.

 

Edited By – Priya Dixit 

ALSO READ: कॅनडामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना बर्फाळ जमिनीवर विमान उलटल्याने १९ प्रवासी जखमी

 

 

Go to Source