Miraj News : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ परिसरातील घराला भीषण आग

                                              कुपवाड डडको कॉलनीत घराला आग कुपवाड : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ डडको कॉलनी परिसरातील एका निवासी घराला गुरुवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण समजले नाही. मात्र, […]

Miraj News : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ परिसरातील घराला भीषण आग

                                              कुपवाड डडको कॉलनीत घराला आग
कुपवाड : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ डडको कॉलनी परिसरातील एका निवासी घराला गुरुवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण समजले नाही. मात्र, महापालिका अग्रिशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले.
आगीच्या विळख्यात असलेल्या घरातून चार गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत माहिती अशी, गुरुवारी दुपारी अडीच वाजता हहको कॉलनीतील एका घराला आग लागल्याचा कॉल अग्रिशमन दलाला आला. माहिती मिळताच अग्रिशमनदलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराच्या आतील भागात आगीने रौद्ररूप धारण केले होते.
आग आटोक्यात आणत असताना जवानांना घरात गॅस सिलिंडरअसल्याचे लक्षात आले. अत्यंत धोकादायक परिस्थितीत जवानांनी जिवाची पर्वा न करता घरामध्ये प्रवेश केला आणि ३ भरलेल्या व १ रिकामी अशा एकूण ४ गॅस सिलिंडरच्या टाक्या सुरक्षितपणे बाहेर काढल्या. वेळेत सिलिंडर बाहेर काढल्यामुळे कॉलनीतील मोठा संभाव्य धोकाटळला. प्रभारी मुख्य अग्रिशमन अधिकारी कासम्मा माने यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन प्रसाद माने, अक्षय झुरे, रोहन मुळीक, वाहन चालक रावसाहेब चव्हाण यांच्या पथकाने ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
जीवितहानी नाही, मालमत्तेचे नुकसान
अग्रिशमन दलाने पाण्याचा मारा करून काही वेळातच आग आटोक्यात आणली. या घटनेत घराचे व घरगुती साहित्याचे नुकसान झाले असले, तरी कोणालाही इजा झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहून तातडीने अग्रिशमन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.