मध्यप्रदेशातील छिंदवाडात सामूहिक हत्याकांड

कुटुंबातील 8 जणांची हत्या : तऊणाची आत्महत्या वृत्तसंस्था /छिंदवाडा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या माहुलझीर पोलीस ठाण्याच्या बोदलकछार गावात आदिवासी कुटुंबातील आठ जणांची सामूहिक हत्या करण्यात आली आहे. हे संतापजनक हत्याकांड कुटुंबातील तऊणानेच घडवले. स्वत:ची आई, पत्नी आणि भावासह एकूण आठ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या हृदयद्रावक हत्येनंतर तऊणानेही गळफास घेत आत्महत्या […]

मध्यप्रदेशातील छिंदवाडात सामूहिक हत्याकांड

कुटुंबातील 8 जणांची हत्या : तऊणाची आत्महत्या
वृत्तसंस्था /छिंदवाडा
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या माहुलझीर पोलीस ठाण्याच्या बोदलकछार गावात आदिवासी कुटुंबातील आठ जणांची सामूहिक हत्या करण्यात आली आहे. हे संतापजनक हत्याकांड कुटुंबातील तऊणानेच घडवले. स्वत:ची आई, पत्नी आणि भावासह एकूण आठ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या हृदयद्रावक हत्येनंतर तऊणानेही गळफास घेत आत्महत्या केली. हत्याकांडाची ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान घडले. घटनेची माहिती मिळताच माहुलझीर पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण गाव सील केले. पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळावरून कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीने भावाच्या एका मुलावरही हल्ला केला होता, मात्र त्याने जीव वाचवण्यासाठी पळ काढल्यामुळे तो बचावला. त्याच्या चौकशीतून पोलिसांना काही प्रमाणात माहिती उपलब्ध झाली आहे. हत्याकांड उघड झाल्यानंतर अधिक तपास केला असता घरातील तरुणाचा मृतदेह घरापासून काही अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दिनेश उर्फ भुरा विश्राम सर्याम (22) असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तऊणाचे 21 मे रोजी लग्न झाले होते. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर अंतरावरची आहे. आरोपीने आई, बहीण, पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे, भाची यांची हत्या केल्याचे पोलीस अधीक्षक मनीष खत्री यांनी सांगितले. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. तसेच त्याने सर्वप्रथम पत्नीची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. आरोपीचा पत्नीसोबत वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद सुरू असताना ही घटना घडली. तथापि, हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेनंतर मृतदेह घरात विखुरले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
हृदयद्रावक…

पत्नी, आई, भाऊ, वहिनी, बहीण, पुतण्या व दोन भाच्यांची हत्या
कुटुंबातील केवळ हल्लेखोराचा पुतण्या बचावला, उपचार सुरू
कारण अस्पष्ट, पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण गाव केले सील
प्रथमदर्शनी कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा पोलिसांचा दावा