जिल्हा रुग्णालयात मास्क अनिवार्य

डॉक्टरांकडून खबरदारी घेण्यासाठी रुग्ण-नातेवाईकांना सूचना बेळगाव : बेळगावसह राज्यभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह नागरिकांच्या तोंडावर पुन्हा मास्क दिसू लागले आहेत. कोरोनाकाळात मास्कची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना मास्क नसताना फिरण्यावर बंदी […]

जिल्हा रुग्णालयात मास्क अनिवार्य

डॉक्टरांकडून खबरदारी घेण्यासाठी रुग्ण-नातेवाईकांना सूचना
बेळगाव : बेळगावसह राज्यभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह नागरिकांच्या तोंडावर पुन्हा मास्क दिसू लागले आहेत. कोरोनाकाळात मास्कची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना मास्क नसताना फिरण्यावर बंदी घालण्यात आली होती. या सक्तीमुळे नागरिकांनाही मास्क अंगवळणी पडला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व कोरोना लसीकरण झाल्यानंतर मास्कवरील निर्बंध हटविण्यात आले होते. आता पुन्हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आल्याने राज्यभरात खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य खात्याकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्य खात्याची बैठक घेऊन खबरदारीची सूचना केली आहे. तसेच कोरोना रुग्ण आढळल्यास आवश्यक ती तयारी करून यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व नातेवाईकांना मास्क अनिवार्य केला आहे. रुग्णांना तपासताना डॉक्टरांकडून मास्क घालण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांच्या तोंडावर पुन्हा मास्क दिसू लागले आहेत.