राजकीय वातावरणामुळे बाजारात उत्साह
केंद्रात एनडीए सरकार होणार स्थापन : सेन्सेक्स 1618 अंकांनी भक्कम स्थितीत
वृत्तसंस्था/ मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार कधी स्थापन होणार या काळजीत अनेक गुंतवणूकदार होते. मात्र आता पेंद्रात नवीन एनडीए सरकार बनणार असून नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान होणार आहे. यामुळे नवीन स्थिर सरकार मिळत असल्याने भारतीय भांडवली बाजारातील वातारणात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स तब्बल 1618.85 अंकांवर मजबूत राहिला होता. तर निफ्टीनेही सकारात्मक कामगिरी केली आहे. याचा फायदा हा गुंतवणूकदारांना अधिक झालेला आहे. सलगची तिसरी तेजी नोंदवत बाजारात शुक्रवारी बंद झाला आहे. यात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षातील जीडीपी संदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आल्याच्या बातमीचाही परिणाम सकारात्मक झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1618.85 अंकांसोबत 2.16 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांक 76,693.36 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 468.75 अंकांच्या मजबूतीसह निर्देशांक 23,290.15 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये शुक्रवारी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक 5.83 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासोबतच विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा स्टील, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, टाटा मोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग हे तेजीत राहिले आहेत. विविध घडामोडींमध्ये भारतात आता नवीन केंद्र सरकारची स्थापना होणार आहे. यामुळे बाजाराला बळ मिळाले आहे. यासोबतच आरबीआय निर्णयांचीही चांगलीच मदत बाजाराला मिळाली. यामुळे गुंतवणूकदार स्थिर झाल्याचे दिसून आल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी राजकीय वातावरणामुळे बाजारात उत्साह
राजकीय वातावरणामुळे बाजारात उत्साह
केंद्रात एनडीए सरकार होणार स्थापन : सेन्सेक्स 1618 अंकांनी भक्कम स्थितीत वृत्तसंस्था/ मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार कधी स्थापन होणार या काळजीत अनेक गुंतवणूकदार होते. मात्र आता पेंद्रात नवीन एनडीए सरकार बनणार असून नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान होणार आहे. यामुळे नवीन स्थिर सरकार मिळत असल्याने भारतीय भांडवली बाजारातील वातारणात मोठ्या उत्साहाचे […]