तिमाही निकालापूर्वीच बाजारात पडझड
सलग दुसरे सत्र घसरणीसह बंद :गुंतवणुकदारांची नफावसुली
वृत्तसंस्था /मुंबई
भांडवली बाजारांमधील सलग दुसऱ्या सत्रात गुरुवारी भारतीय शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये चढउताराचे सत्र राहिल्याने बाजारात काहीशी घसरण राहिली. कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर होण्याच्या अगोदरच बाजारात पडझडीचे सत्र राहिले होते. यामध्ये गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे ही स्थिती झाली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 27.43 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.03 टक्क्यांसोबत 79,897.34 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 8.50 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 24,315.95 वर बंद झाला आहे.
गुरुवारी सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 16 समभाग हे वधारले आहेत. तसेच आयटीसी, टाटा मोर्ट्स, एशियन पेन्ट्स, स्टेट बँक आणि टायटन यांचे समभाग पहिल्या पाचमध्ये अव्वल राहिले. तर टाटा स्टील, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 14 समभाग हे नुकसानीत राहिले. यामध्ये बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, नेस्ले इंडिया आणि पॉवरग्रिड हे समभाग घसरणीत होते.
यासह सनफार्मा, लार्सन अॅण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अदानी पोर्टस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. विविध घडामोडींमध्ये तिमाही अहवालांचे निकाल सादर होण्याची चिंता व हवामानाचे सादर होणारे वेगवेगळे अहवाल यांचा बाजारातील कामगिरीवर परिणाम होत आहे. असे अभ्यासकांनी म्हटले आहे. आशियातील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँगचा बाजार तेजीत राहिले आहेत. तर युरोपीयन बाजारात सकारात्मक स्थिती राहिली होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
ओएनजीसी 304
बीपीसीएल 306
कोल इंडिया 500
आयटीसी 458
टाटा मोटर्स 1020
एसबीआय 856
एशियन पेंटस् 3022
कोटक महिंद्रा 1844
टायटन 3248
एलटीआय माइंट्री 5407
टाटा स्टील 168
हिंडाल्को 696
अॅक्सिस बँक 1296
टीसीएस 3923
बजाज फिनसर्व्ह 1587
हिरो मोटोकॉर्प 5526
इंडसइंड बँक 1429
इन्फोसिस 1652
एचडीएफसी लाइफ 634
अपोलो हॉस्पिटल 6389
एचसीएल टेक 1511
समभाग घसरलेल्या कंपन्या
टाटा कन्झु. 1131
बजाज फायनान्स 6950
महिंद्रा आणि महिंद्रा 2698
डिव्हीस लॅब्ज 4582
एनटीपीसी 377
सनफार्मा 1581
पॉवरग्रिड कॉर्प 342
नेस्ले 2593
श्रीराम फायनान्स 2739
बजाज ऑटो 9466
लार्सन टुब्रो 3621
अल्ट्राटेक सिमेंट 11554
अदानी एंटरप्रायझेस 3078
भारती एअरटेल 1437
सिप्ला 1506
मारुती सुझुकी 12715
आयशर मोटर्स 4828
आयसीआयसीआय 1238
अदानी पोर्टस् 1483
विप्रो 534
एचडीएफसी बँक 1621