6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य घटले
1 लाख 40 हजार कोटींनी टीसीएस, इन्फोसिसचे सर्वाधिक नुकसान
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरील दहापैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 40 हजार कोटी रुपयांनी घटले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस यांचे झाले आहे.
मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये आघाडीवरील सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 40 हजार 478 कोटी रुपयांनी घटल्याचे दिसून आले आहे. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1156 अंकांनी घसरला होता. रामनवमीनिमित्त बुधवारी शेअर बाजाराला सुट्टी असल्याने मागच्या आठवड्यात बाजाराचे चारच दिवस कामकाज झाले. एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसून आले.
या कंपन्यांचे झाले नुकसान
टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 62 हजार 538 कोटी रुपयांनी घटून 13 लाख 84 हजार 804 कोटी रुपयांवर राहिले होते. इन्फोसिस या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 30 हजार 488 कोटी रुपयांनी घटून 5 लाख 85 हजार 936 कोटी रुपयांवर राहिले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 26423 कोटी रुपयांनी घटून 7 लाख 49 हजार 23 रूपयांवर घसरले होते तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 14234 कोटी रुपयांनी घटून 6 लाख 70 हजार 59 कोटी रुपयांवर आले होते.
Home महत्वाची बातमी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य घटले
6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य घटले
1 लाख 40 हजार कोटींनी टीसीएस, इन्फोसिसचे सर्वाधिक नुकसान वृत्तसंस्था/ मुंबई आघाडीवरील दहापैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 40 हजार कोटी रुपयांनी घटले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस यांचे झाले आहे. मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये आघाडीवरील सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 […]