मार्कंडेय नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहित

पाणीपातळीत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा बेळगाव : मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेय नदी प्रवाहित झाली आहे. दमदार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच मार्कंडेय भरून वाहू लागली आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला पोषक […]

मार्कंडेय नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहित

पाणीपातळीत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेय नदी प्रवाहित झाली आहे. दमदार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच मार्कंडेय भरून वाहू लागली आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दमदार पावसाने नदी-नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीतही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी तीन फुटांनी वाढली आहे. त्याचबरोबर बेळगुंदी, बैलूर या भागात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने मार्कंडेय पात्रात पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे. जूनअखेरपर्यंत कोरडी असणारी मार्कंडेय जुलैच्या सुरुवातीलाच भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील पिकांना दिलासा मिळाला आहे.