अॅशेस मालिकेसाठी मार्क वूड तंदुरुस्त
वृत्तसंस्था / मेलबोर्न
यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेला पर्थ येथे गुरूवार 20 पासून प्रारंभ होत आहे. स्नायु दुखापतीमुळे जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज मार्क वूड आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याने इंग्लंडच्या चमुमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पर्थच्या पहिल्या कसोटीत तो खेळेल, अशी आशा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे.
ही पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघासाठी सरावाचा सामना आयोजित केला होता. या सामन्यातील पहिल्या दिवशी वूडने 8 षटकांची गोलंदाजी केली. यानंतर त्याच्या स्नायु दुखापतीची चाचणी पुन्हा करण्यात आली आणि तो पहिल्या कसोटीसाठी तंदुरुस्त असल्याचे त्यांच्या वैद्यकीय सल्लागाराने सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर मार्क वूडची वेगवान गोलंदाजी अधिक भेदक ठरेल, अशी आशा कर्णधार स्टोक्सने व्यक्त केली. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टिव्ह स्मिथ तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्स करीत आहे.
ऑस्ट्रेलिया संघ: स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अॅबॉट, बोलॅन्ड, कॅरे, डॉगेट, ग्रीन, हॅजलवूड, हेड, इंग्लीस, उस्मान ख्वॉजा, लाबुसेन, लियॉन, स्टार्क, विथराल्ड, वेबस्टर,
इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), आर्चर, अॅटकिनसन, शोएब बशिर, बेथेल, ब्रुक, कार्स, क्रॉले, डकेट, जॅक्स, ऑली पॉप, पॉट्स, रूट, जेमी स्मिथ, टंग आणि मार्क वूड.
Home महत्वाची बातमी अॅशेस मालिकेसाठी मार्क वूड तंदुरुस्त
अॅशेस मालिकेसाठी मार्क वूड तंदुरुस्त
वृत्तसंस्था / मेलबोर्न यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेला पर्थ येथे गुरूवार 20 पासून प्रारंभ होत आहे. स्नायु दुखापतीमुळे जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज मार्क वूड आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याने इंग्लंडच्या चमुमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पर्थच्या पहिल्या कसोटीत तो खेळेल, अशी आशा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. […]

