किरकोळ महागाई दर 4.85 टक्क्यांवर
5 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळाला आहे. देशाचा किरकोळ महागाई दर मार्च महिन्यात कमी होत 5 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 4.85 टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 5.09 टक्के राहिला होता. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये हा दर 4.87 टक्के इतका होता.
एनएसओच्या डाटानुसार मार्चमध्ये अन्नधान्याचा महागाई दर 8.52 टक्के राहिला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 8.66 टक्के होता. किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या कक्षेत आहे. आरबीआयने किरकोळ महागाई दर 4 टक्के (2 टक्के अधिक किंवा कमी) राखण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. आरबीआयकडून किरकोळ महागाईचा दर विचारात घेतच व्याजदरांसंबंधी निर्णय घेतले जात असतात.
आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दर 4.5 टक्के राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. आरबीआयने एप्रिल-जून तिमाहीत किरकोळ महागाई दर 4.9 टक्के आणि सप्टेंबर तिमाहीत 3.8 टक्के राहण्याचा अनुमान व्यक्त केला आहे.
Home महत्वाची बातमी किरकोळ महागाई दर 4.85 टक्क्यांवर
किरकोळ महागाई दर 4.85 टक्क्यांवर
5 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर : वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळाला आहे. देशाचा किरकोळ महागाई दर मार्च महिन्यात कमी होत 5 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 4.85 टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 5.09 टक्के राहिला होता. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये हा दर 4.87 टक्के इतका होता. एनएसओच्या डाटानुसार मार्चमध्ये […]