मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत किंचित वाढ होत आहे. 15 दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात 5.30 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र धरण क्षेत्रात मंगळवार, 2 जुलै रोजी सातही धरणात 7.15 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी 70 हजार दशलक्ष लिटरवर आलेला पाणीसाठा 2 जुलै रोजी 1 लाख 3 हजार 503 दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू राहिली, तर लवकरच मुंबईकरांची 10 टक्के पाणीकपातीतून सुटका होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, जुलै महिन्यात धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग होईल, त्यामुळे आणखी पाणीकपात करण्याबाबत कोणताही निर्णय नाही. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली. त्यात जून महिन्यात कडक उन्हाळा असल्याने बाष्पीभवनामुळे आणखीच पाण्याच्या पातळीत घट होत गेली. त्यामुळे मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. हळुवार पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. दरम्यान, भातसा धरणातून 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणातून 91 हजार 130 दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा राज्य सरकारने उपलब्ध केला आहे. राखीव पाणीसाठा वापरास सुरुवात केली असून, राखीव पाणीसाठा आणि पालिकेच्या अखत्यारित असलेला पाणीसाठा पुढील 25 दिवस मुंबईची तहान भागवेल इतका आहे. तलाव क्षेत्रातील पाऊसअप्पर वैतरणा – 344 मिमी मोडक सागर – 439 मिमी तानसा – 396 मिमी मध्य वैतरणा – 485 मिमी भातसा – 498 मिमी विहार – 554 मिमी तुळशी – 627 मिमी2 जुलै रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)अप्पर वैतरणा -0 मोडक सागर – 29,403 तानसा –  28,132 मध्य वैतरणा – 26,785 भातसा – 10,760 विहार – 6,071 तुळशी – 2,353हेही वाचा परळमध्ये वडाचे झाड अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यूसर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत किंचित वाढ होत आहे. 15 दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात 5.30 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र धरण क्षेत्रात मंगळवार, 2 जुलै रोजी सातही धरणात 7.15 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी 70 हजार दशलक्ष लिटरवर आलेला पाणीसाठा 2 जुलै रोजी 1 लाख 3 हजार 503 दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू राहिली, तर लवकरच मुंबईकरांची 10 टक्के पाणीकपातीतून सुटका होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, जुलै महिन्यात धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग होईल, त्यामुळे आणखी पाणीकपात करण्याबाबत कोणताही निर्णय नाही.संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली. त्यात जून महिन्यात कडक उन्हाळा असल्याने बाष्पीभवनामुळे आणखीच पाण्याच्या पातळीत घट होत गेली. त्यामुळे मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. हळुवार पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.दरम्यान, भातसा धरणातून 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणातून 91 हजार 130 दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा राज्य सरकारने उपलब्ध केला आहे. राखीव पाणीसाठा वापरास सुरुवात केली असून, राखीव पाणीसाठा आणि पालिकेच्या अखत्यारित असलेला पाणीसाठा पुढील 25 दिवस मुंबईची तहान भागवेल इतका आहे. तलाव क्षेत्रातील पाऊसअप्पर वैतरणा – 344 मिमीमोडक सागर – 439 मिमीतानसा – 396 मिमीमध्य वैतरणा – 485 मिमीभातसा – 498 मिमीविहार – 554 मिमीतुळशी – 627 मिमी2 जुलै रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)अप्पर वैतरणा -0मोडक सागर – 29,403तानसा –  28,132मध्य वैतरणा – 26,785भातसा – 10,760विहार – 6,071तुळशी – 2,353हेही वाचापरळमध्ये वडाचे झाड अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू
सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

Go to Source