आशा कार्यकर्त्यांचा जिल्हा पंचायतवर मोर्चा

थकीत वेतन त्वरित द्या : तांत्रिक त्रुटी दूर करून सध्याच्या महागाई वाढीनुसार गौरवधन देण्याची आशा कार्यकर्त्यांची मागणी बेळगाव : जिल्ह्यात गावागावात काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना केंद्र सरकारकडून दिले जाणारे प्रोत्साहन धन आरसीएच पोर्टलशी लिंक केले आहे. यामुळे आशा कार्यकर्त्यांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे. यातील त्रुटी दूर करून वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, आशा कार्यकर्त्यांनाही […]

आशा कार्यकर्त्यांचा जिल्हा पंचायतवर मोर्चा

थकीत वेतन त्वरित द्या : तांत्रिक त्रुटी दूर करून सध्याच्या महागाई वाढीनुसार गौरवधन देण्याची आशा कार्यकर्त्यांची मागणी
बेळगाव : जिल्ह्यात गावागावात काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना केंद्र सरकारकडून दिले जाणारे प्रोत्साहन धन आरसीएच पोर्टलशी लिंक केले आहे. यामुळे आशा कार्यकर्त्यांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे. यातील त्रुटी दूर करून वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, आशा कार्यकर्त्यांनाही महिना 15 हजार वेतन देण्यात यावे, विविध कामांसाठी नियोजित केलेला भत्ता देण्यात यावा, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांकडून जिल्हा पंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना निवेदन देण्यात आले. येथील सरदार्स मैदानावरून कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा पंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आशा कार्यकर्त्यांकडून सरकारची अनेक कामे करून घेतली जात आहेत. मात्र, त्या प्रमाणात वेतन दिले जात नाही. सध्याच्या महागाईच्या काळात देण्यात येणारे गौरवधन अत्यल्प आहे. त्यामुळे आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवून कार्य केले जात आहे. मात्र, अपेक्षेनुसार वेतन दिले जात नसल्याने आशा कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य खात्याबरोबर संलग्न होऊन घरोघरी सरकारच्या योजनांची माहिती दिली जात आहे. मात्र, त्यानुसार वेतन दिले जात नाही. सध्याच्या महागाईनुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. काम करूनही अनेक आशा कार्यकर्त्यांना गेल्या तीन-चार महिन्यांचे वेतन देण्यात आले नाही. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित कार्यालयाला वारंवार भेट देऊनही कामे केली जात नाहीत.
तसेच खात्याकडून मोबाईल आणि डाटा दिला जात असला तरी मोबाईलवर आधारित कामे करण्याची सक्ती केली जात आहे. शहरातील आशा कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त कामे करून घेतली जात आहेत. मात्र, त्यानुसार भत्ता दिला जात नाही. नियोजित काम वगळून इतर कामांसाठीही आशा कार्यकर्त्यांचा उपयोग करून घेतला जात आहे. अशा समस्यांच्या निवारणासाठी तीन महिन्यांतून एकदा जिल्हास्तरीय आशा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने आशा कार्यकर्त्यांकडून सेवेनुसार वेतन देण्यात यावे, इतर कामांसाठी राबवून घेतले जात असताना नियोजित कार्यानुसार गौरवधन देण्यात यावे, महिन्याला 15 हजार वेतन देण्यात यावे, आरसीएच पोर्टलवर निर्माण झालेल्या समस्या दूर करून थकीत प्रोत्साहनधन त्वरित वितरण करण्यात यावे, आशा कार्यकर्त्यांचे थकीत असणारे एएनपी, पीएनसी आणि एचबीएनसीएमआर-1, एमआर-2 यांचा हिशेब करून थकीत गौरवधन त्वरित देण्यात यावे. 2019-21 मधील कोरोनाकाळातील विशेष प्रोत्साहनधन 2 हजार रुपये कोणालाही मिळाले नाहीत. ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
विविध मागण्यांचे निवेदन सादर
खात्याच्या आदेशानुसार प्रत्येक आशा कार्यकर्त्याला महिन्याला वेतन देण्यात यावे, ग्रामीण भागातील आशा कार्यकर्त्यांना आपले कार्यक्षेत्र सोडून इतर ठिकाणी कामासाठी नियुक्त करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, खात्याच्या आदेशानुसारच इतर कामांवर नियुक्ती करावी, त्यानुसार वेतनही देण्यात यावे. निवडणूक व इतर कामांसाठी नेमणूक करताना वेतन देणे, टीबी प्रोग्रॅमसाठी दिलेल्या सेवेचे थकीत मानधन त्वरित वितरित करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

Go to Source