बेळगावात आज मराठी साहित्य संमेलन

► प्रतिनिधी/ बेळगाव अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 18 रोजी पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे छ. शिवाजी महाराज संमेलननगरीत संमेलन होणार आहे. बेळगावकरांना ही एक साहित्याची मेजवानी ठरणार असून मान्यवर लेखक, कवी संमेलनात सहभागी होणार […]

बेळगावात आज मराठी साहित्य संमेलन

► प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 18 रोजी पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे छ. शिवाजी महाराज संमेलननगरीत संमेलन होणार आहे. बेळगावकरांना ही एक साहित्याची मेजवानी ठरणार असून मान्यवर लेखक, कवी संमेलनात सहभागी होणार आहेत.
सीमाभागातील नागरिक मागील 65 वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी जिद्द व चिकाटीने लढा देत आहेत. हा संर्घष गौरवगीतांच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. सीमाकवी रवींद्र पाटील यांनी लिहिलेल्या, संगीतकार शरद गोरे यांनी शब्दबद्ध केलेल्या व गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिलेल्या अखंड महाराष्ट्राचा लढा हे गीत रविवारी रसिकांच्या भेटीला येत आहे.