मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची पंतप्रधानांसह मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे मदतीची हाक

सध्या इराण इस्राईल संघर्ष सुरु आहे. अनेक देशांनी विमानतळ बंद केले आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा देखील सध्या कुवेत मध्ये अडकला आहे. त्यांनी त्याला भारतात आणण्यासाठी व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे …

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची पंतप्रधानांसह मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे मदतीची हाक

vishakh subhedar facebook

सध्या इराण इस्राईल संघर्ष सुरु आहे. अनेक देशांनी विमानतळ बंद केले आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा देखील सध्या कुवेत मध्ये अडकला आहे. त्यांनी त्याला भारतात आणण्यासाठी व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आर्त हाक देत रडत रडत व्हिडीओ पोस्ट केलं आहे. या मध्ये त्यांनी मुलाला भारतात आणण्यासाठी साकडं घातलं आहे. 

ALSO READ: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

इस्रायल (Israel) आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सध्या संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. मध्य पूर्वेतील इराण आणि इस्राईल संघर्षाचा परिणाम जगभरातील प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. अनेक देशांनी युद्ध सुरु झाल्यावर विमानतळ बंद केलं आहे. दुबई विमानतळ बंद झाल्यामुळे अणे भारतीय दुबईला अडकले आहे.  अनेक प्रवासी विमानानं मुंबई व बंगळुरूमध्ये आणले गेले. पण अनेक अजून देखील तिथे अडकले आहे. 
 

मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा सध्या कुवेत मध्य अडकला आहे. तो लंडनला जाण्यासाठी निघाला होता मुंबईवरून निघालेलं विमान कुवेत मध्ये उतरवलं आणि प्रवाशांची आणि नागरिकांच्या सुरक्षेला बघता दुबई विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले. तिथे अडकलेला त्यांचा मुलगा चार दिवसांपासून एका हॉटेल मध्ये आहे.  

ALSO READ: मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात

अभिनेत्रीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. व्हिडीओमधून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं आहे.

त्या म्हणाल्या, मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या की, “नमस्कार मी विशाखा सुभेदार… माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे… माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र, कुवेतमध्ये त्याचं फ्लाईटमध्ये उतरवण्यात आले आहे.

ALSO READ: बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक
गेल्या चार दिवसांपासून तिथं एअर स्पेस नसल्यामुळे विमानं रद्द करण्यात आली आहेत. माझा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकलाय. आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तिथे ड्रोन हल्ले होत आहेत. त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आमच्या मुलांची काळजी घ्यावी, ही विनंती सरकारला करतेय. लवकरात लवकर मार्ग काढावा.

 

Edited By – Priya Dixit