मराठा आरक्षण: मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली

Maratha Reservation: मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यसरकार ने सादर केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनला सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, क्युरेटिव्ह …

मराठा आरक्षण: मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली

Maratha Reservation: मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यसरकार ने सादर केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनला सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सुप्रीम कोर्टाने 24 जानेवारी 2024 रोजी पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणी घेणार. याचा अर्थ असा आहे की , सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले आहे.आता लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे वाटत आहे.   

सध्या मराठा आरक्षण मुद्दा हा तापला असून या मुद्द्यावर राज्य सरकार कडून क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठ समोर सुनावणी झाली. त्यात राज्यसरकार कडून सुनावणीत आपली भूमिका मांडण्यात आली होती.

सुप्रीम कोर्ट लवकरच त्यावर निर्णय देणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्ट स्वीकारणार की नाही हा मोठा प्रश्न होता. मात्र आज सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून आता 24 जानेवरी 2024 रोजी यावर होणाऱ्या सुनावणी काय होणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

 

Edited By- Priya DIxit  

 

Go to Source