मिहीर पोतदारकडे मराठा गोल्फ चषक
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आयोजित मराठा चषक गोल्फ स्पर्धेत उद्योगपती व गोल्फपटू अनिल पोतदार यांचे चिरंजीव मिहीर पोतदारने मराठा गोल्फ चषक पटकाविला. या स्पर्धेमध्ये बेळगावसह, बेंगळूर, हुबळी, कोल्हापूर येथील 186 नामांकित गोल्फ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये मिहीर पोतदारने पीटीए गोल्फ कोर्टवर मातब्बर खेळाडूवर मात करत मराठा गोल्फ चषकावर आपले नाव कोरले. बक्षीस वितरण एमएलआरसीचे कमाडंट ब्रिगेडीअर जॉयदीप मुखर्जी व मान्यवरांच्या हस्ते मिहीर पोतदारला चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, लोकमान्य सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी यांच्यासह जेष्ठ गोल्फपटू इतर मान्यवर उपस्थित होते. मिहीरने प्रथमच या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावित यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.
Home महत्वाची बातमी मिहीर पोतदारकडे मराठा गोल्फ चषक
मिहीर पोतदारकडे मराठा गोल्फ चषक
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आयोजित मराठा चषक गोल्फ स्पर्धेत उद्योगपती व गोल्फपटू अनिल पोतदार यांचे चिरंजीव मिहीर पोतदारने मराठा गोल्फ चषक पटकाविला. या स्पर्धेमध्ये बेळगावसह, बेंगळूर, हुबळी, कोल्हापूर येथील 186 नामांकित गोल्फ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये मिहीर पोतदारने पीटीए गोल्फ कोर्टवर मातब्बर खेळाडूवर मात करत मराठा गोल्फ चषकावर आपले नाव […]
