अर्थसंकल्पाबाबत मनपातील अनेक विभागांना गांभीर्यच नाही

जमा-खर्चाच्या अहवालाबाबत नोटिसा देऊनही दुर्लक्ष बेळगाव : महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर करावा लागणार आहे. त्याबाबत लेखा विभागाकडून विविध विभागांना करण्यात आलेल्या जमा-खर्चाची माहिती द्यावी, अशी नोटीस चारवेळा देण्यात आली आहे. लेखा प्रमुख मंजुनाथ बिळगीकर यांनी ही नोटीस पाठविली आहे. मात्र सर्वच विभागांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करताना अडचणी […]

अर्थसंकल्पाबाबत मनपातील अनेक विभागांना गांभीर्यच नाही

जमा-खर्चाच्या अहवालाबाबत नोटिसा देऊनही दुर्लक्ष
बेळगाव : महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर करावा लागणार आहे. त्याबाबत लेखा विभागाकडून विविध विभागांना करण्यात आलेल्या जमा-खर्चाची माहिती द्यावी, अशी नोटीस चारवेळा देण्यात आली आहे. लेखा प्रमुख मंजुनाथ बिळगीकर यांनी ही नोटीस पाठविली आहे. मात्र सर्वच विभागांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सर्व विभागांकडून जमा-खर्च लेखाजोखा महत्त्वाचा असतो. त्यानंतर महापालिकेच्या संपूर्ण जमा-खर्चाचा अहवाल तयार करून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र प्रत्यक्षात एकाही विभागाकडून वर्षभरातील जमा-खर्चाचा अहवालच देण्यात आला नाही. त्यामुळे मुख्य लेखा विभागाला अडचणी निर्माण झाल्या आहेत.
चारवेळा नोटीस देऊनही उत्तर नाहीच
महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर होणार आहे. त्याकाळातच हा अर्थसंकल्प देखील सादर करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक अडचणींना लेखा विभागाला तोंड द्यावे लागणार आहे. कोणत्याच विभागाकडून चारवेळा नोटीस दिल्यानंतरही उत्तर आले नाही. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांनाच याबाबतची माहिती दिली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर करायचा असेल तर तातडीने सर्व विभागांनी अहवाल देणे गरजेचे आहे. अन्यथा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.