मंत्रीच्या शतकाने मध्यप्रदेशला सावरले
वृत्तसंस्था/ नागपूर
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी हिमांषू मंत्रीच्या समायोचित शतकाने मध्यप्रदेशला सावरले. या सामन्यात मंत्रीने 265 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 126 धावा झळकविल्या. मध्यप्रदेशने विदर्भवर पहिल्या डावात 82 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 170 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर मध्यप्रदेशचा पहिला डाव रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी 94.3 षटकात 252 धावांवर आटोपला. विदर्भच्या अचूक गोलंदाजीसमोर मध्यप्रदेशने सावध फलंदाजी केली. मंत्री आणि हर्ष गवळी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. त्यानंतर विदर्भच्या यश ठाकुरने गवळीला झेलबाद केले. त्याने 77 चेंडूत 25 धावा जमविल्या. विदर्भतर्फे यश ठाकुरने 51 धावात 3 तर उमेश यादवने 40 धावात 3 गडी बाद केले. सागर सोळंकीने 25 धावा जमविता मंत्री समवेत पाचव्या गड्यासाठी 42 धावांची भागिदारी केली. सोळंकी बाद झाल्यानंतर सारांश जैनने मंत्री समवेत सहाव्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. मध्यप्रदेशचा पहिला डाव 94.3 षटकात 252 धावांवर आटोपला. अक्षय वाकरेने 68 धावात 2 गडी बाद केले. 82 धावांनी पिछाडीवर असलेल्या विदर्भने आपल्या दुसऱ्या डावाला सुरूवात केली आणि दिवस अखेर त्यांनी 1 बाद 13 धावा जमविल्या. विदर्भचा सलामीचा फलंदाज तायडे बाद झाला. मध्यप्रदेशचा संघ 69 धावांनी आघाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक – विदर्भ प. डाव 170, मध्यप्रदेश प. डाव 94.3 षटकात सर्व बाद 252 (हिमांषू मंत्री 126, सारांश जैन 30, सोळंकी 25, उमेश यादव, यश ठाकुर प्रत्येकी 3 बळी, अक्षय वाकरे 2-68), विदर्भ दु. डाव 1 बाद 13.
Home महत्वाची बातमी मंत्रीच्या शतकाने मध्यप्रदेशला सावरले
मंत्रीच्या शतकाने मध्यप्रदेशला सावरले
वृत्तसंस्था/ नागपूर 2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी हिमांषू मंत्रीच्या समायोचित शतकाने मध्यप्रदेशला सावरले. या सामन्यात मंत्रीने 265 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 126 धावा झळकविल्या. मध्यप्रदेशने विदर्भवर पहिल्या डावात 82 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 170 […]