आशियाई मॅरेथॉनमध्ये मानसिंगला सुवर्ण
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
रविवारी येथे झालेल्या आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू मानसिंगने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. 34 वर्षीय मानसिंग हा या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा दुसरा भारतीय धावपटू ठरला आहे.
पुरूषांच्या विभागात मानसिंगने 2 तास 14 मिनिटे आणि 19 सेकंदाचा अवधी घेत पहिल्या स्थानासह सुवर्णपदक मिळविले. मानसिंगची मॅरेथॉनमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये त्याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. चीनच्या याँगझेंगने 2 तास 15 मिनिटे 24 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर किर्जिस्तानच्या इलियाने तिसरे स्थान पटकाविले. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला भारताचा आणखी एक धावपटू बेलीअप्पाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या विभागात भारताच्या अश्विनी जाधवला आठवे स्थान मिळाले.
Home महत्वाची बातमी आशियाई मॅरेथॉनमध्ये मानसिंगला सुवर्ण
आशियाई मॅरेथॉनमध्ये मानसिंगला सुवर्ण
वृत्तसंस्था/ हाँगकाँग रविवारी येथे झालेल्या आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू मानसिंगने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. 34 वर्षीय मानसिंग हा या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा दुसरा भारतीय धावपटू ठरला आहे. पुरूषांच्या विभागात मानसिंगने 2 तास 14 मिनिटे आणि 19 सेकंदाचा अवधी घेत पहिल्या स्थानासह सुवर्णपदक मिळविले. मानसिंगची मॅरेथॉनमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुंबई […]