मनोहरलाल खट्टर यांचा आमदारकीचा राजीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बुधवारी आमदारपदाचा राजीनामा दिला. याआधी मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता भाजपने खट्टर यांना लोकसभा निवडणुकीसाठी करनाल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यापूर्वी त्यांनी विधानसभेतच राजीनामा देण्याची घोषणा केली. ते करनाल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. आता नायबसिंग सैनी करनाल जागेची जबाबदारी सांभाळतील, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य या नात्याने सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Home महत्वाची बातमी मनोहरलाल खट्टर यांचा आमदारकीचा राजीनामा
मनोहरलाल खट्टर यांचा आमदारकीचा राजीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बुधवारी आमदारपदाचा राजीनामा दिला. याआधी मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता भाजपने खट्टर यांना लोकसभा निवडणुकीसाठी करनाल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यापूर्वी त्यांनी विधानसभेतच राजीनामा देण्याची घोषणा केली. ते करनाल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. आता नायबसिंग सैनी करनाल जागेची जबाबदारी सांभाळतील, असे ते म्हणाले. […]
