मंजुनाथ एस.‘सतीश शुगर क्लासिक’चा मानकरी

पहिला उपविजेता के. कुमार, स्वरुप बंगेरा दुसरा उपविजेता : वरुणकुमारला उत्कृष्ट पोझरचा बहुमान बेळगाव : आयबीबीएफ मुंबई यांच्या मान्यतेनुसार कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व गोकाक तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या सतीश शुगर क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगिरीचा मंजुनाथ एस. याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन […]

मंजुनाथ एस.‘सतीश शुगर क्लासिक’चा मानकरी

पहिला उपविजेता के. कुमार, स्वरुप बंगेरा दुसरा उपविजेता : वरुणकुमारला उत्कृष्ट पोझरचा बहुमान
बेळगाव : आयबीबीएफ मुंबई यांच्या मान्यतेनुसार कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व गोकाक तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या सतीश शुगर क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगिरीचा मंजुनाथ एस. याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब पटकाविला. पहिले उपविजेतेपद बेंगळूरचा के. कुमार तर दुसरे उपविजेतेपद उडुपीच्या स्वरुप बंगेरा याने पटकाविले. उत्कृष्ट पोझरचा किताब दावणगिरीच्या वरुणकुमारने मिळविला. गोकाकच्या वाल्मिकी मैदानावरती घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील जवळपास 250 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे –
55 किलो गट –1) कृष्णप्रसाद- उडुपी, 2) शुभम चौगुले- बेळगाव, 3) गोविंद यादव -उडुपी, 4) राजू मुचंडीकर- बेळगाव, 5) केतन भातकांडे-बेळगाव,
60 किलो गट –1) विशाल निलजकर- बेळगाव, 2) उमेश गंगणे- बेळगाव, 3) गौतम बी. आर.- चिक्कमंगळूर, 4) साजिल बाशा- दावणगिरी, 5) सुरज भंडारी- बेळगाव.
65 किलो गट –1) संजय के.- दावणगिरी, 2) महेश पाटील- बेळगाव, 3) बसाप्पा कोणेरी- बेळगाव, 4) नागेश चोर्लेकर- बेळगाव, 5) चंदनकुमार- धारवाड.
70 किलो गट –1) सुनील भातकांडे- बेळगाव, 2) शरणू एस. एच.- बागलकोट, 3) प्रताप कालकुंद्रीकर- बेळगाव,  4) लखन कांबळे-बेळगाव, 5) सुरेश राठोड- धारवाड.
75 किलो गट –1) के. कुमार- बेंगळूर, 2) व्यंकटेश ताशिलदार- बेळगाव, 3) प्रथम पुजारी-दक्षिण कन्नडा,  4) शरद शेरुगर-उडुपी, 5) विनायक पी. -शिमोगा.
80 किलो गट –1) अमन शेख-एलएलके, 2) प्रशांत खन्नूकर- बेळगाव, 3) विशाल चव्हाण- बेळगाव, 4) होस्टन- उडुपी, 5) विजय पी. -धारवाड.
85 किलो गट –1) स्वरुप बंगेरा-उडुपी, 2) सत्यनारायण आर. टी.- दावणगिरी, 3) गिरीश मॅगेरी- धारवाड, 4) अन्स सिंग- बेंगळूर, 5) अमर गुरव- बेळगाव.
85 किलोवरील गट –1) मंजुनाथ एस.- दावणगिरी, 2) व्ही. बी. किरण- बेळगाव, 3) अश्रुत सुजाण- द. कन्नडा, 4) किसन शेट्टी- द. कन्नडा.
त्यानंतर झालेल्या सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबासाठी कृष्णप्रसाद, विशाल निलजकर, संजू के., सुनील भातकांडे, के. कुमार, अमन शेख, स्वरुप बंगेरा, मंजुनाथ एस. यांच्यात लढत झाली. त्यामध्ये मंजुनाथ एस., के. कुमार व स्वरुप बंगेरा यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये मंजुनाथ एस. ने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर 12 व्या सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला. पहिले विजेतेपद के. कुमार तर दुसरे उपविजेतेपद स्वरुप बंगेरा यांनी पटकाविले.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी, अजित सिद्दण्णावर, सुनील आपटेकर, जे. निलकंठ, जे. डी. भट, दिलीपकुमार, उमा महेश, गंगाधर एम., हेमंत हावळ, रियाज चौगुला, रमेश कळ्ळीमनी, संजय देवरमनी, काटेश गोकावी, लखन पुजारी, कृष्णा चिक्कतुंबल यांच्या हस्ते विजेत्या मंजुनाथ एस. याला दोन लाख रुपये रोख, आकर्षक चषक, मानाचा किताब, प्रमाणपत्र, भेटवस्तू तर पहिल्या विजेत्या के. कुमारला 1 लाख रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र तर दुसऱ्या उपविजेता स्वरुप बंगेराला 50 हजार रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पोझरच्या स्पर्धेत दावणगिरीच्या वरुणकुमार जीव्हीके यांनी किताब पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते 10 हजार रुपये रोख, किताब, चषक देऊन गौरविण्यात आले.