श्रीकांतला हरवून मंजुनाथ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
अस्मिता, त्रीसा-गायत्री उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था /बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या थायलंड मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला दुसऱ्या फेरीत मंजुनाथकडून पराभव पत्करावा लागला. त्याचप्रमाणे या स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसेच मंजुनाथ आणि अस्मिता यांनी एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने चीन तैपेईच्या वेंग वेईचा 22-20, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. मात्र पुढील फेरीत मिथून मंजुनाथने श्रीकांतचा 21-9, 13-21, 21-17 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अस्मिताने चीन तैपेईच्या पेईचा 21-12, 15-21, 21-17, त्रीसा आणि गायत्री या जोडीने आपल्याच देशाच्या तनीषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांचा 21-15, 24-22 असा पराभव करून आगेकूच केली.
Home महत्वाची बातमी श्रीकांतला हरवून मंजुनाथ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
श्रीकांतला हरवून मंजुनाथ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
अस्मिता, त्रीसा-गायत्री उपांत्यपूर्व फेरीत वृत्तसंस्था /बँकॉक विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या थायलंड मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला दुसऱ्या फेरीत मंजुनाथकडून पराभव पत्करावा लागला. त्याचप्रमाणे या स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसेच मंजुनाथ आणि अस्मिता यांनी एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने चीन […]