अबकारी धोरण प्रकरणी मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 6 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सुनावणी करत हा निर्णय दिला आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुनावणीस हजर राहण्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. सिसोदिया हे मागील वर्षापासून तुरुंगात आहेत.
यापूर्वी 7 मार्च रोजी न्यायालयाने सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 19 मार्चपर्यंत वाढविली होती. दुसरीकडे आप राज्यसभा खासदार संजय सिंह यांना न्यायालयीन सुनावणीप्रकरणी सूट मिळाली आहे. आरोपींनी सुमारे 95 अर्ज दाखल केल्याने सुनावणीत विलंब होत असल्याचे ईडीने न्यायालयासमोर म्हटले आहे. ईडीच्या या वक्तव्यावर आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. मनीष सिसोदिया हे मागील काही काळापासून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांचे अनेक जामीन अर्ज आतापर्यंत फेटाळण्यात आले आहेत.
Home महत्वाची बातमी अबकारी धोरण प्रकरणी मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ
अबकारी धोरण प्रकरणी मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 6 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सुनावणी करत हा निर्णय दिला आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुनावणीस हजर राहण्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. सिसोदिया हे मागील वर्षापासून तुरुंगात आहेत. यापूर्वी 7 […]