मणिपूर महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ पुणे हॉकी इंडियाच्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत मणिपूर महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. ग गटातील मंगळवारी झालेल्या सामन्यात मणिपूरने उत्तराखंडचा 11-2 अशा गोल फरकाने पराभव केला. या स्पर्धेत ग गटातील अन्य एका सामन्यात कर्नाटकाने दादरानगर हवेलीचा 13-0 असा एकतर्फी पराभव केला. मणिपूर आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्यात सरिता देव ब्रह्मचारियम, […]

मणिपूर महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ पुणे
हॉकी इंडियाच्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत मणिपूर महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. ग गटातील मंगळवारी झालेल्या सामन्यात मणिपूरने उत्तराखंडचा 11-2 अशा गोल फरकाने पराभव केला. या स्पर्धेत ग गटातील अन्य एका सामन्यात कर्नाटकाने दादरानगर हवेलीचा 13-0 असा एकतर्फी पराभव केला.
मणिपूर आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्यात सरिता देव ब्रह्मचारियम, प्रभलिन कौर तसेच सी. इबेमल यांनी प्रत्येकी 2 गोल नोंदविले. वर्तिका रावत, सोनिया देवी, रंजीता, कर्णधार लिली छानू, तसेच छानू के. यांनी प्रत्येकी 1 गोल केला. उत्तराखंडतर्फे कोमल धामी आणि मोनिका चंद यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. कर्नाटक आणि दादरा-नगर हवेली यांच्यातील सामन्यात कर्नाटकातर्फे कर्णधार एस. पी. व्रुतीकाने हॅट्ट्रीकसह 4 गोल, एम. जी. याशिकाने 3 गोल, चंदनाने 2 गोल, एस. अधिरा, प्रशुसिंग परिहार, अंजली, गायत्री यांनी प्रत्येकी 1 गोल केला.