आसामला नमवून मणिपूर उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ इटानगर
संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात माजी विजेत्या मणिपूरने आसामचा 7-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
या सामन्यात आसामच्या तुलनेत मणिपूरचा खेळ अधिक वेगवान आणि दर्जेदार झाला. मणिपूर संघातील सदानंद सिंगने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली. सदानंदने 11 व्या, 16 व्या आणि 70 व्या मिनिटाला असे 3 गोल केले. मणिपूरतर्फे कर्णधार मेताईने चौथ्या मिनिटाला एन. पाचासिंगने 19 व्या मिनिटाला, मेबाम डिनेसिंगने 82 व्या मिनिटाला आणि इमरसन मेताईने 88 व्या मिनिटाला गोल केले. आसामतर्फे एकमेव गोल जॉयदीप गोगोईने केला. 2023-24 च्या 77 व्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील सदानंदने आतापर्यंत 11 गोल केले आहेत.
Home महत्वाची बातमी आसामला नमवून मणिपूर उपांत्य फेरीत
आसामला नमवून मणिपूर उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ इटानगर संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात माजी विजेत्या मणिपूरने आसामचा 7-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात आसामच्या तुलनेत मणिपूरचा खेळ अधिक वेगवान आणि दर्जेदार झाला. मणिपूर संघातील सदानंद सिंगने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली. सदानंदने 11 व्या, 16 व्या आणि 70 व्या मिनिटाला असे 3 […]